Tuesday, 24 March 2020

ह्या चंद्रास सावळ्या

ह्या चंद्रास सावळ्या

ह्या चंद्रास सावळ्या
विचारता आले मला
का त्याच्या जागी दिसला
तुझा हा चेहरा मला?

दाटला आता अंधार इथे
चांदण्यांचा आधार मला
पाहता तळ्यात एक
हास्य तुझे मिळे मला

काळ चालतो जरा
न जाणवे कसे मला
हरवले त्या स्वप्नी
वेड लागले मला

न जाणवो हा दुरावा
भेट दे तू मला
न सोडता साथ तुझी
नात्यात जुळू दे मला

                    - खुशग्नी हरि सावंत



No comments:

Post a Comment

हिवाळा

   आज तो गार वारा जाणवला कारण, धुक्यातून हळूच  हिवाळा बहरुन येत होता      हिवाळा, ऊन्हा पावसाच्या वाटेने इथे पोहोचत होता हिवाळा, हवेत हळूच श...