Thursday, 9 April 2020

आजीच्या सुरकुत्या

आजीच्या सुरकुत्या

वेड्याप्रमाणे मी
त्या सुरकुत्या मोजत
होते.
आयुष्यातील कितीतरी
गोष्टी
मोजता येतात.

प्रत्येक सुरकुती आपला
प्रवास सांगते;
बालपणातील निरागस
चेहरा,
तरूण वयातील ते
बेफिकीर जगणं,
प्रौढ वयातील संसार
सगळा
त्या सुरकुत्यांनी झाकला
होता.

आता फक्त उरलं ते
म्हातारपण
जे ह्या सुरकुत्यांनी
दिसतं.
आयुष्य जगण्याचं
समाधान
ह्या सुरकुत्यांनी दिसतं.

                    - खुशग्नी हरि सावंत

2 comments:

हिवाळा

   आज तो गार वारा जाणवला कारण, धुक्यातून हळूच  हिवाळा बहरुन येत होता      हिवाळा, ऊन्हा पावसाच्या वाटेने इथे पोहोचत होता हिवाळा, हवेत हळूच श...